महंत भडकले… २०१९ मध्ये भाजपविरोधात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

अयोध्येतील दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला थेट आवाहन दिले आहे. जर पुन्हा सत्तेत यायचे असेल तर राम मंदिर उभारा अन्यथा २०१९ मध्ये भाजपाविरोधात आंदोलन करू असा इशाराच महंतांनी केंद्र सरकारला दिला आहे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काही दिवसांपूर्वी गोव्यातील पणजी येथे आयोजित ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात राम मंदिरावर विधान केले होते. २०१९ च्या निवडणुकांमध्ये हिंदुत्व व राम मंदिर या मुद्दयांना स्थान नसेल. तर फक्त विकास हाच आमचा मुद्दा असेल असे नक्वी यांनी म्हटले होते. तसेच पंतप्रधान मोदीच नाही तर संपूर्ण भाजपचे लक्ष्यच आता विकास आहे. असेही नक्वी यांनी सांगितले होते. यावरच महंत यांनी भाजपला आंदोलनाचा इशारा दिला आहे.