वाराणसी घाण आहे ! केंद्रीय मंत्र्यांनी मारली टीकेची पिचकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फोन्स यांनी शहीदाच्या पार्थिवासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फटकारले.

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

‘वाराणसी हे गलिच्छ शहर असून वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका पर्यटन क्षेत्रालाही बसल्याने वाराणसीत पर्यटक येईनासे झाले आहेत’. असे विधान करून केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोंस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. अल्फोंस यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपचे अनेक मंत्री सावरासावर कऱण्यासाठी पुढे सरसावले असून स्वच्छतेबाबत वाराणसीचा सातवा क्रमांक असल्याचे उत्तर त्यांनी दिलं आहे.

अल्फोंस दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर आले होते. पण येथील प्रदूषण, अस्वच्छता, वाहतूक कोंडीची समस्या बघून त्यांचा भ्रमनिरास झाला. यामुळे ते व्यथित झाले व त्यांनी थेट स्वच्छता अभियानावरच प्रश्नचिन्ह उभारले. त्यातच वाराणसी हा मोदींचा मतदारसंघ असल्याने त्याबद्दल असे विधान केंद्रीय मंत्र्याने केल्याने भाजपची पुरती गोची झाली. तर याच विधानाला मुद्दा बनवून विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपचे आमदार रविंद्र जयस्वाल यांनी अल्फोंस यांच्या विधानावर आपलं मत व्यक्त केलं व या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेच्या बाबतीत वाराणसी ७ व्या क्रमांकावर आहे असं ते म्हणाले. तर मोदींचे मंत्रीच त्यांच्या ४ वर्षाच्या कार्यकालातील कामाचा खुलासा करत असल्याची टीका सपाच्या प्रवक्ता जुही सिंह यांनी केली आहे.

दरम्यान अल्फोंस यांनी यावेळी वाराणसीतील पर्यटकांचा आकडा कमी झाल्याने चिंताही व्यक्त केली आहे.