शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई 

शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून अनेक शेतकरी अद्यापही वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अर्ज भरता यावा यासाठी सरकारकडून १५ जूनपर्यंत मुदतवाढ वाढविण्यात आली आहे.  राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत ऐतिहासिक व पारदर्शक कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु २००८ आणि २००९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. तसेच २००१ ते २०१६ या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही कारणाने आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.