४९ महिन्यांपासून अघोषित आणीबाणीच! काँग्रेसचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
surjewala

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

स्वतःच्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेsसवर टीका करीत आहेत. गेल्या ४९ महिन्यांपासून त्यांनी लोकशाहीला गुलाम बनविले असून देशात अघोषित आणीबाणीच आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात आणीबाणीच्या आठवणी जागवत काँग्रेसवर टीका करताना एका कुटुंबासाठी आणीबाणी लादली, असे वक्तव्य केले. या टीकेला उत्तर देताना  सुरजेवाला म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा परत आणू, वर्षाला २ कोटी रोजगार देऊ अशी अनेक आश्वासने जनतेला दिली होती. मात्र ही आश्वासने खोटी ठरली आहेत. त्यामुळे  आपले अपयश आणि ‘जुमले’ झाकण्यासाठी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर हल्ला करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या काळात देशात अघोषित आणीबाणीच सुरू आहे. सरकारला विरोध करेल त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.