
सामना प्रतिनिधी । मुंबई
खिळेमुक्त झाड ही मोहीम राबविणाऱ्या ‘आंघोळीची गोळी’च्या टीमने पर्यावरणाला असलेला प्लॅस्टिकचा धोका लक्षात घेऊन नागरिकांकडून प्लॅस्टिक पिशव्या गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात नागरिकांना हिरवेगार रोपटे देण्यात येणार आहे. वसुंधरा ग्रीन क्लब यांच्या सहाकार्याने शनिवार, ७ जुलैला रुईया कॉलेजमध्ये हा उपक्रम सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
रस्त्यावरच्या झाडांना ठोकलेले आणि रुतलेले खिळे काढून झाडे खिळेमुक्त, कचरामुक्त करणे हा आंघोळीची गोळी टीमचा उद्देश आहे.या मोहिमेनंतर या टीमने ‘प्लॅस्टिक पिशव्या द्या; बदल्यात रोपटे घ्या’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत १०० रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. पाच प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात एक रोपटे देऊन प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांची जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क – तुषार वारंग -९९६९२९४३०२ , जयेश हरसोरा- ९३२३२८८१९८
























































