
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाल्याचे तिने स्वत: सोशल मीडियावर जाहीर केले होते. तिच्या या पोस्टमुळे बॉलिवूडमधील तिच्या मित्र मैत्रिणींना जबर धक्का बसला आहे.तसेच बॉलिवूडच्या कलाकारांनी सुद्धा सोनालीला सोशल मीडियावरुन तिचा आजार लवकर बरा व्हावा याकरता प्रार्थना केल्या आहेत.
सोनाली बेंद्रेन बुधवारी तिला कर्करोग झाला असल्याची पोस्ट इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरुन केल्यानं ही बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. यानंतर अक्षय कुमारनं गुरुवारी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात भेट घेतली होती . त्यानंतर आता अभिनेत्री व मॉडेल लीसा रे हिनं सुद्धा तिच्या ट्विटरच्या माध्यमातून सोनाली बद्दलच्या तिच्या मनातील भावना व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, ‘प्रिय सोनाली मी सध्या तुझ्याबद्दल विचार करत आहे तसेच तुझ्याबद्दल बोलण्याकरता शब्द ही कमी पडत आहेत, यामुळे मी तुला खूप प्रेम पाठवत आहे’.
Dear @iamsonalibendre you are in my thoughts. Words often fall short and I’ve learned that okay, but I do want to send love.
— Lisa Ray (@Lisaraniray) July 7, 2018
लीसा २००९ रोजी कर्करोगाशी झुंज देत होती. पण लीसा या आजारातून आता पूर्णपणे बरी झाली आहे. यामुळे लीसानं सोनाली करता केलेले ट्विट सोनालीसाठी प्रेरणादायी ठरेल अशी चर्चा चालू आहे.

























































