
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाल्याचे तिने स्वत: काल सोशल मीडियावर जाहीर केले. तिच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमधील तिच्या मित्र मैत्रिणींना जबर धक्का बसला आहे. सोनली बेंद्रेसोबत चारपेक्षा अधिक चित्रपटात काम केलेला तिचा सहकलाकार आणि तिचा चांगला मित्र अक्षय कुमाारने न्यूयॉर्कमधील रुग्णालयात जाऊन सोनालीची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्याने ‘सोनाली ही लढाऊ वृत्तीची आहे. या आजारातून बरे होण्यासाठी देव तिला मदत करो’ अशी प्रतिक्रीया दिली आहे.
सोनाली बेंद्रेला कर्करोग असल्याची बातमी काल वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर बॉलिवूडमधील कलाकरांनी देखील सोनाली लवकर बरी व्हावी म्हणून सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. अनिल कपूर, अभिषेक बच्चन, फराह खान, अजय देवगण, अर्जुन कपूर, रितेश देशमुख, नेहा धुपिया, दिया मिर्झा, बिपाशा बासू, दिव्या दत्ता, करण जोहर, आफताब शिवदसानी, इलियाना डिक्रूझ, विवेक ओबेरॉय या कलाकारांनी सोशल मीडियावरून सोनालीला शुभेच्छा पाठविल्या.






























































