‘ही’ अभिनेत्री ठरणार बिग बॉसची विजेती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा आज फिनाले आहे. बिग बॉसचे हे पर्व कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या बिग बॉसच्या फिनालेचे शूटींग सुरू असून तेथील सेटवरून ‘सामना’ला मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि अभिनेता पुष्कर जोग यांची नाव सध्या विजेते पदाच्या शर्यतीत आहेत. स्मिता हीला प्रेक्षकांसोबत माजी स्पर्धकांची देखील प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे पुष्कर आणि स्मिता यांच्याच नावांची सध्या चर्चा आहे.

smita-gondkar-1

बिग बॉसच्या फिनालेचे सध्या शूटींग सुरू असून सर्व स्पर्धकांचे एका पेक्षा एक जबरदस्त डान्स फिनालेमध्ये बघायला मिळणार आहेत. या शूटींगच्या वेळीच सेटवर बिग बॉस कोण जिंकणार यांची जबरदस्त चर्चा रंगली असून सर्वांच्या तोंडात स्मिता गोंदकरचेच नाव आहे. बिग बॉसचे माजी स्पर्धक सुशांत शेलार, रेशम टिपणीस, जुई गडकरी, हर्षदा खानविलकर, उषा नाडकर्णी, राजेश श्रृंगारपुरे यांना स्मिता जिंकणार असं वाटतंय. आज बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदाची माळ स्मिताच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे.