पुरुष भक्तांचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

पुरुषांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमध्ये तो पुरुषांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं दिसून आलं होतं, त्या आधारे त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, हा मांत्रिक गेल्या दशकभरापासून पुरुषांवर अत्याचार करत होता.

आसिफ नुरी असं या मांत्रिकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ स्वतःमध्ये दैवी सामर्थ्य असल्याचा दावा करत असे. आपल्या दैवी सामर्थ्याच्या आधारे भक्तांच्या समस्या दूर करत असल्याचा दावा आसिफ करत असे.त्याच्या या दाव्याला भुललेल्या पुरुषांना तो पूजा करण्याच्या बहाण्याने एकांतात बोलवत असे आणि त्यांना बेशुद्ध करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे.

गेल्या दशकभरापासून त्याने नांदेड, परभणी, बुलढाणा, संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये त्याने विविध तरुण आणि विवाहित पुरुषांवर लैंगिक अत्याचार केले होते. आसिफवर भादंवि ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात त्याचे अन्य काही साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे.