
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज बांधवांनी ठोक मोर्चा आंदोलन सुरू केलं आहे. सोमवारी कायगाव येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळते.
मराठा आंदोलनाचे सर्व अपडेट:
- शिर्डीमध्ये विष पिऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, विष्णू गंभीरे (२४) तरुणाचे नाव
- आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल, विष्णू गंभीरे यांची प्रकृती स्थिर, उपचार सुरू
- वाचा सविस्तर : आंदोलन चिघळण्यास मुख्यमंत्री, मंत्र्यांची वक्तव्य जबाबदार – शरद पवार
- मराठा समाजाकडून उद्या मुंबई, नवी मुंबई बंदची हाक
- मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांच्या बैठकीत निर्णय
- मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये बंदचे आवाहन. अत्यावश्यक सेवा, सुविधा बंदमधून वगळल्या
- उद्या कल्याणच्या तहसिलदार कार्यालयावर मोर्चा
- महाराष्ट्र बंद : जमावाकडून हॉटेल रिलॅक्सवर दगडफेक; लाखोंचे नुकसान
- कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून आंदोलन छेडले. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली
- वाचा सविस्तर – मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा; अन्यथा आमदारकीचा राजीनामा!
- नगर : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी नगर बंदची हाक देण्यात आली
- वाचा सविस्तर बातमी : मराठा क्रांती मोर्चाची गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक
- श्रीरामपूर : मराठा समाजाच्यावतीने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला
- मोटारसायकल रॅली काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
- संभाजीनगर : कायगाव टोका येथील आंदोलन मागे, काल दुपारपासून सुरू होते आंदोलन
- गारगोटी : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती संघटनेच्या वतीने कडकडीत बंद व चक्काजाम
- परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; दगडफेकीच्या घटनांनी बसस्थानकात शुकशुकाट, सचखंड रेल्वे दोन तास रोखली
- कर्जत – कर्जतमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला
- फोटो- पुण्यातही कडकडीत बंद
- मराठा आरक्षण आंदोलन: लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद
- पाहा फोटो गॅलरी – शेवगाव येथे मोर्चाला हिंसक वळण
- पाहा फोटो गॅलरी -संभाजीनगरात महाराष्ट्र बंदचे पडसाद
- गेवराई – सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद, मालेगाव फाट्यावर बस फोडली
- शिरोळ – तालुक्यातील कडकडीत बंद, शहरातील प्रमुख चौकात टायर जाळण्यात आले
- वाचा सविस्तर बातमी – मराठा समाजाचा रास्तारोको : महामार्गावर पाच किलोमीटरच्या रांगा
- हातकणंगले – आंदोलकांनी पाच एसटी बसेसवर जोरदार दगडफेक केली
- संतप्त आंदोलकांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखून धरला, मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी
- वाचा सविस्तर बातमी : घनसावंगी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाला हिंसक वळण
- पाथर्डी येथे मुख्य चौकात राष्ट्रीय महामार्ग २२२ वर आंदोलकांनी टायर जाळले
- गाणगापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चावेळी ट्रक पेटवून देण्यात आला
#WATCH: Maratha Kranti Morcha workers set ablaze a truck in Aurangabad’s Gangapur as a mark of their protest demanding reservation for Maratha community in government jobs & education. #Maharashtra pic.twitter.com/OIdBJlSLpo
— ANI (@ANI) July 24, 2018
- जालना – घनसावंगी तालुक्यातील तिर्थपूरी येथे कडकडीत बंद, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची रेड्या वरून धिंड
- जालना – अंबड तालुक्यात कडकडीत बंद
- वाचा सविस्तर बातमी : मराठा आरक्षण – फडणवीस सरकार गेंड्याच्या कातडीचे
- सौताडा येथे मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेचे दहन
- हिंगोली नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आली
- कायगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल काडगावकर यांचा हृदयविकाराने मृत्यू
- नगर-संभाजीनगर-पुणे महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
- वाचा सविस्तर बातमी: हिंगोलीत पोलिसांची गाडी पेटवली, वसमतला दगडफेक
- नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आज आंदोलन करण्यात आले, यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले
- संभाजीनगरमध्ये जगन्नाथ विश्वनाथ पाटील-सोनवणे (वय-६०) यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी विष घेतलं
- शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मराठा बांधवांच्या भावना लोकसभेच्या सभागृहात मांडल्या
- शिवसेना खासदारांनी मराठा आंदोलनाचा मुद्दा लोकसभेत मांडला
- वाचा सविस्तर बातमी: आमदार प्रशांत बंब तुम्ही कुठे आहात? मराठा आंदोलकांचा रोष
- पाहा फोटोगॅलरी
- वाचा सविस्तर बातमी: हिंगोलीत एसटी सेवा बंद
- वाचा सविस्तर बातमी: जामखेड येथे सकल मराठा समाजाचे रास्तारोको आंदोलन
- पुणे-संभाजीनगर महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको, पैठण आणि शेवगाव मार्गे वाहतूक वळवली
- वाचा सविस्तर बातमी: आंदोलन तीव्र… आणखी एका मराठा युवकाची नदी पात्रात उडी
- मराठा आरक्षण प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तातडीची पत्रकार परिषद
- सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी येथे आंदोलनाला सुरुवात, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे
- धाराशिव येथे मराठा समाजाचे आंदोलन
- नगर शहरांमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, हुतात्मा स्मारकापाशी मराठा बांधव एकत्र जमले
- नगरमध्ये आंदोलनाचे पडसाद
- वाचा सविस्तर बातमी: बीड जिल्ह्यात कडकडीत बंद
- कायगावमध्ये वातावरणात प्रचंड तणाव
- आग विझवण्यासाठी आलेल्या जवानांवर कुदळ-फावडी फेकली
- पेटवलेल्या अग्निशमनच्या गाडीचा स्फोट
- संतप्त जमावाने अग्निशमन दलाची गाडी जाळली
- जमावाने पोलिसांच्या तुकड्यांवर केली दगडफेक
- कायगावमध्ये आंदोलक पुन्हा आक्रमक
- संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद, अफवा पसरू नये म्हणून प्रशासनाने घेतला निर्णय
- चौकाचौकात मराठा आंदोलन झाले
- संभाजीनगरमध्ये आंदोलक रस्त्यावर, तरुणांची संख्या अधिक
- मराठवाड्यात आंदोलनाची तीव्रता अधिक
- राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर
- अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना येणास मनाई
- ज्या ठिकाणी शिंदे यांनी जलसमाधी घेतली त्याच परिसरात केले अंत्यसंस्कार
- वाचा सविस्तर बातमी: मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार
- काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
- शिंदे कुटुंबीयांच्या मागण्या मान्य
- राज्यभरातून मराठा आंदोलक कायगावकडे निघाले






























































