
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन याच्या चाहत्यांसाठी खुश खबर आहे. २०१४ साली विभक्त झालेले ऋतिक आणि सुझान पुन्हा एकत्र येणार आहेत. ते पुन्हा लग्न करणार आहेत. मुलांसाठी पुन्हा एकत्र येण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
चार वर्षांपूर्वी ऋतिक आणि सुझान विभक्त झाले आणि त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. हॅपी कपल म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाणाऱ्या या दाम्पत्याने परस्पर संमतीनेच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या विभक्त होण्याची अनेक कारणेंही पुढे आली होती. पण या दोघांनी कधीही त्यावर भाष्य केले नाही. उलट अभिनेत्री कंगना रणावतने ऋतिकवर गंभीर आरोप केल्यानंतर सुझानने ऋतिकची बाजू घेतली होती. ऋतिकच्या बचावासाठी सुझान पुढे आल्याची ती काही पहिली घटना नव्हती. त्याआधीही अनेकवेळा सुझानने ऋतिकवरील आरोपांना उत्तरे दिली होती. यामुळे ते वेगळे जरी झाले असले तरी त्यांच्यात एकमेकांबदद्ल आदर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर बऱ्याचवेळा हे दोघे मुलांबरोबर सुट्टी घालवण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी, डिनर करण्यासाठी एकत्र आले होते. दरम्यान, पुन्हा एकत्र येण्याबदद्ल या दोघांनी जाहीर भाष्य केले नसले तरी त्यांच्या घरात मात्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
सध्या ऋतिक ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये बिझी आहे. पण आपल्या या बिझी शेड्यूलमधून तो मुलांसाठी व सुझानसाठी वेळ काढतोय.

























































