आठवड्याचे भविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मानसी इनामदार, ज्योतिषतज्ज्ञ

मेष – व्यवसायात फायदा
तुमचे आकर्षक व्यक्तिमत्त्व हे तुमचे मोठे भांडवल आहे. त्याचा या आठवडय़ात तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी जांभळे वस्त्र परिधान करा. यश निश्चित आहे. व्यवसायात चढउतार संभवतात. पण त्यात तुमचाच फायदा आहे. कुटुंबाचे मन राखा.
शुभ आहार – आवडीचे पदार्थ

वृषभ – कौतुक होईल
खूप भावनिक व्हाल. खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवू नका. गुंतवणुकीचा निर्णय पुढे ढकला. तुमची कामातील हातोटी, तुमचा प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. संयम आणि शांतता राखा. राखाडी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – शेंगदाणे, राजमा

मिथुन -आनंदी वातावरण
पूर्वी केलेली गुंतवणूक आता कामी येईल. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम असेल. गोंधळाची स्थिती निर्माण होईल. पण तुम्ही तुमचे मन स्थिर ठेवा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमचा जोडीदार कायम प्रयत्नशील राहील. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – रंगीत शिमला मिरची, फळभाज्या, भाकरी

कर्क – कर्जमुक्त व्हाल
घरासाठी घेतलेले सर्व कर्ज फिटेल. त्यामुळे खूप मोकळे आणि समाधानी वाटेल. कुटुंबासमवेत आनंदोत्सव साजरा कराल. तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या सर्व अपेक्षा पूर्ण कराल. जोडीदाराची छान साथ लाभेल. अबोली रंग जवळ बाळगा. लहान मुलांसमवेत वेळ घालावा.
शुभ आहार – पराठा, पनीर, दूध

सिंह – मनाप्रमाणे घडेल
सामाजिक, धार्मिक कार्यात रमाल. त्यामुळे मनास समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. मनासारखे काम मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागा. फायदा होईल. जोडीदारासमवेत थोडय़ा कुरबुरी होतील. पण दुर्लक्ष करा. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – हिरव्या भाज्या, रानभाज्या

कन्या – लहानांकडून लाड
तुमच्या हातून उच्च कामगिरी होणार आहे. त्यामुळे आपल्या कामाविषयी सतर्क राहा. उच्च वर्तुळात वावरण्याचा योग येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे काळजीपूर्वक करा. लहानांकडून मिळालेली काळजी, जिव्हाळा दिल जीत लेगी. लाल रंग महत्त्वाचा.
शुभ आहार – घरी केलेला फराळ, गोड पदार्थ

तूळ – नव्या संधी
तुमचे संवादकौशल्य कामी येईल. त्यातून मोठा आर्थिक लाभ संभवतो. जिभेवर साखर ठेवा. तरच फायदा होईल. क्रोधाची वचने नको. नाटय़ क्षेत्रातील व्यक्तींना नव्या संधी मिळतील. त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही लाभेल. हातातील मोठे काम पूर्ण होईल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – गूळ, गुळाचे पदार्थ

वृश्चिक – मनास समाधान
हा आठवडा कामामुळे खूप थकविणारा असेल. पण काम यशस्वी झाल्यामुळे मनास समाधान लाभेल. त्यापुढे श्रमाचे काही वाटणार नाही. उधळेपणा टाळा. दुसऱयांकडून घेतलेल्या धनाची परतफेड करा. गरजूंना मदत करा. विशेषतः अन्नदान करा. पांढरा रंग शांतता प्रदान करेल.
शुभ आहार ः माफक तामसी पदार्थ

धनू -नवी घडामोड
व्यक्तिगत आयुष्यात नवी घडामोड घडेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांचे आशीर्वाद लाभतील. समुद्र सान्निध्य लाभेल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – मत्स्याहार.

मकर – मस्त आठवडा
अतिरिक्त पैसा सुरक्षित जागी ठेवा. भविष्यात त्याचा लाभ होईल. घरातील समस्येची पूर्तता तुमच्यामुळे होईल. धार्मिक कार्यासाठी उत्तम आठवडा आहे. सूर्याचा प्रकाश अंगावर घ्या. त्यामुळे मानसिकता सकारात्मक होईल. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – श्रीखंड, लोणी

कुंभ -आवडत्या व्यक्तीचा सहवास
तर्कसंगत वागण्याचा प्रयत्न करा. त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळविण्याचा प्रयत्न कराल. वाणीवर नियंत्रण ठेवा. काचेपासून लांब राहा. परमानंदाची अनुभूती मिळेल. श्रीमंत व्यक्ती झाल्यासारखे वाटेल. नारिंगी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – भात, पोहे, पुऱया

मीन – प्रेमात यश
इच्छा साकार करण्यासाठी विलक्षण मेहनत आणि चिकाटीची आवश्यकता असेल. पण तुम्हाला यात नक्की यश मिळणार आहे. नवे प्रकल्प हाती घ्याल. उत्साही वातावरण लाभेल. प्रेमात यश मिळेल. आठवडय़ाची सुरुवात चांगली होईल. लाल रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – बीट, काकडी, सलाड