
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या परळ-करीरोड स्थानकांदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने आज सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झाल्याने ही लोकल परळ करीरोड स्थानकादरम्यान थांबली आहे. त्यामुळे अप स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे.





























































