
सामना ऑनलाईन । लंडन
हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली जगातला सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्यापासून जपून राहावे असा इशारा इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहम गूचने कोहलीची तारीफ करताना दिला आहे. कोहली फलंदाजीत टॉपवर असून इंग्लिश भूमीवरील मागचे अपयश धुवून काढण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करणार असेही गूच म्हणाला.
कोहलीने २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात ५ कसोटी लढतींत फक्त १३४ धावा केल्या होत्या. त्याची त्या दौऱ्यातील सर्वोच्च धावसंख्या होती ३९. पण म्हणून विराटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तो एक जिगरबाज क्रिकेटर आहे. पूर्वीचे अपयश धुण्यासाठी तो जोरदार खेळ करू शकतो असा विश्वास गुचने व्यक्त केला.
कोहली आणि रूट सर्वच फॉरमॅटमध्ये फिट
विराट कोहली आणि जो रूट हे दोघेही क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमध्ये फिट ठरणारे खेळाडू आहेत. वेगवेगळ्या खेळाडूंची एकमेकांशी तुलना करणे मला पटत नाही. पण कोहली आणि रूट दोघेही मॅचविनर क्रिकेटपटू आहेत एवढे मात्र खरे ,अशी स्तुतीसुमनेही ग्रॅहम गुचने दोघांवर उधळली. त्या दोघांची फलंदाजी पाहणे हा आनंददायी अनुभव असतो .कारण दोघेही मैदानाच्या चारी दिशांना शॉट खेळतात असेही गूच म्हणाला.
गेल्या इंग्लंड दौऱ्यापेक्षा कोहली आता उत्तम फॉर्ममध्ये दिसतोय. मागच्या अपयशाचे उट्टे तो नक्कीच काढेल असा मला विश्वास आहे. असे हिंदुस्थानचा माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीनने म्हटले आहे.
summery…kohli is worlds best crickter, aware of him

























































