
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
२४ वर्षीय तरुणाने घरासमोर राहत असलेल्या दोन मुलांच्या आईला फूस लावून पळवून नेल्याची घटना बायजीपुरा भागात सोमवारी घडली. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बायजीपुरा, संजयनगर भागात २४ वर्षीय तरुण सलमान खान याचे घरासमोर राहणाऱ्या दोन मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध जुळले होते. महिलेचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, तिला ११ वर्षांची मुलगी तर नऊ वर्षांचा मुलगा आहे. प्रेमसंबंधाची पूर्ण मोहोल्ल्यात चर्चा होती. पतीला समजल्याने त्याने पत्नीवर कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली. प्रेमात पतीचा अडसर ठरत असल्याने दोघांनी पळून जाण्याचे ठरवले. सोमवारी सायंकाळी तरुण सलमान खान याने ३० वर्षीय प्रेयसीला फूस लावून पळवून नेले. महिला घरातून बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. सलमान खान यानेच महिलेला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत पतीने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सहायक निरीक्षक शरद जोगदंड यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. सलमान खान हा एका राष्ट्रवादी नेत्याचा पुतण्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
























































