आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रविवार म्हटलं की मस्त सुट्टीचा दिवस त्यामुळे भटकंतीसाठी अनेकजण घराबाहेर पडतात. मात्र आज घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक बघूनच निघा. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आज तिन्ही मार्गांवरील लोकल १० ते १५ मिनिटाने उशीरा धावतील. सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हा विशेष ब्लॉक रुळ, सिग्नल यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते ४.१५ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण वरून येणाऱ्या सर्व जलद लोकल स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व लोकल जवळपास २० मिनीटे उशीराने धावतील
हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावरील पनवेल वाशी मार्गावरील डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर देखील ठाणे ते पनवेल दरम्यान अप डाऊन दोन्ही मार्गावरील सेवा सकाळी १० ते ४.३० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ट्रान्स मार्गावरून वाशी व नेरुळदरम्यान लोकल धावतील

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत अप डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरच्या लोकल धीम्या मार्गावर चालतील.

SUMMARY : MEGABLOCK ON CENTRAL, WESTERN, HARBOUR RAILWAYS