
सामना प्रतिनिधी । मुंबई
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये फोलीमॅक्स हे औषध दिले असताना फोलीट्रक्स हे कर्करोगावरील औषध दिल्याने दिगंबर धुरी यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे आले असता या प्रकरणात मालाडमधील कल्पेश मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द वरण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
दिगंबर धुरी यांची पत्नी आशा धुरी हिने पोलीस ठाणे तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार नोंदविली. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. औषध निरीक्षकांनी केलेल्या तपासात काही ठळक त्रुटी आढळून आल्या होत्या. यात रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत श्येडय़ुल एच-१ औषधाची विना प्रिस्क्रिप्शन व विनाबिल विक्री केल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच विक्री बिलावर फार्मासिस्टच्या सह्या नसल्याचेही आढळून आले. यावर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी कल्पेश मेडिवल या दुकानदाराचा औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली. या आदेशाविरोधात सदर औषध विक्रेत्या दुकानदाराने अपील दाखल केले. या दुकानदाराचा एक भागीदार स्वतः फार्मासिस्ट आहे तसेच गेल्या १९ वर्षांपासून हे दुकान सुरू असून त्यांच्या विरोधात आतापर्यंत कोणतीही कार्यकाही झालेली नाही. या सर्व बाबी विचारात घेऊन दुकानदारास नैसर्गिक न्यायाचा हक्क मिळावा यासाठी दुकानदाराचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या आदेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र अंतिम सुनावणीकेळी यापुढेसुद्धा अशा व्यक्तीच्या चुकीमुळे सर्वसाधारण जनतेच्या आरोग्यास धोका होऊ नये यासाठी दुकानदाराचा परवाना कायमस्करूपी रद्द करण्याचा निर्णय गिरीश बापट यांनी घेतला.
बिल न देता दिले औषध
दिगंबर धुरी जेव्हा या मेडिवलमध्ये गेले तेव्हा तिथे फार्मासिस्ट नव्हता. तेथे उपस्थित विक्रेत्याने डॉक्टरांचे प्रिस्किप्शन बघून व्हिटॅमिनच्या गोळय़ा देण्याऐवजी कर्करोगाचे औषध दिले. यामुळे दिगंबर धुरी यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे जे औषध दिले त्याचे बिलही विक्रेत्याने धुरी यांना दिले नाही.
























































