
सामना प्रतिनिधी । मुंबई
दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध हॉर्निमन सर्पलजवळ अनेक वर्षांनी पुन्हा एकदा शेअर बाजार भरणार आहे. सन 1872 मध्ये बांधण्यात आलेले हे पहिल्या श्रेणीचे पुरातन गार्डन आणि फाऊंटन असून त्याचे जतन करण्याचे पालिकेने ठरवले आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी या गार्डनमध्ये शेअर बाजार भरत होता, असे सांगितले जाते. त्यामुळे हे गार्डन जतन करताना इथे पुन्हा एकदा शेअर बाजाराच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांसाठी हे मोठे आकर्षण ठरणार आहे.
हॉर्निमन सर्पल हा दक्षिण मुंबईत कामानिमित्त येणाऱया अनेकांचा भेटण्याचा स्पॉट किंवा लॅण्डमार्प म्हणून लक्षात ठेवला जाणारा स्पॉट आहे. गोलाकार गार्डनमध्ये भरपूर झाडे, चालण्यासाठी पायवाटा आणि मधोमध कलाकृतीचा उत्तम नमुना असलेली कारंजी आहेत. अनेक मुंबईकरांसाठी दुपारच्या वेळी शांत बसवण्यासाठी किंवा भेटीसाठी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सध्या दुरवस्थेत असलेले हे सर्पल गार्डन जतन करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. हॉर्निमन सर्पल हे श्रेणी एक प्रकारची पुरातन वास्तू म्हणून गणली जाते. फ्लोरा फाऊंटन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वास्तू किंवा पालिका मुख्यालयाची वास्तू इतकाच या सर्पल गार्डनचा दर्जा आहे. त्यामुळे त्याच्या मूळ रचनेला धक्का न लावता ही वास्तू जतन करावी लागणार आहे.
या गार्डनचे फेन्सिंग आणि प्रवेशद्वारे सध्या मोडकळीस आली आहेत. प्रवेशद्वारावरील हेरिटेज पद्धतीचे दिवेसुद्धा बंद पडलेले आहेत. तसेच आतल्या गार्डनचीही दुरवस्था झाली आहे. या गार्डनच्या बांधकामात वैशिष्टय़पूर्ण अशा ‘रॉटआयर्न’ धातूचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जतन करताना त्याचीही काळजी घ्यावी लागणार असल्याची प्रतिक्रिया अधिकाऱयांनी दिली आहे.
n या सर्पलशी संबंधित इतिहास शोधत असताना बऱयाच वर्षांपूर्वी शेअर बाजार भरत असल्याचे आढळून आले. शेअर बाजाराची इमारत अस्तित्वात येण्यापूर्वी या ठिकाणी शेअर बाजारातील घडामोडी टिपण्यासाठी लोक इथे जमत असत. त्यामुळे हा इतिहास पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न हे सर्पल जतन करताना केला जाणार आहे.
एमटीडीसीने केली सूचना
मुंबई आणि उपनगरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आराखडा तयार केला आहे. त्याचा भाग म्हणून हॉर्निमन सर्पल परिसराचा कायापालट करावा तसेच या ठिकाणी संगीत कारंजे सुरू करावे, अशी सूचना एमटीडीसीने पालिकेला केली आहे. हे सर्पल महापालिकेच्या अखत्यारित येत असल्यामुळे या गार्डनचे जतन करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने पालिकेला पत्र लिहिले आहे. हे गार्डन जतन करण्यासाठी राज्य सरकारचा पर्यटन विभाग सहकार्य करील असेही आश्वासन देण्यात आले आहे.






























































