पाहा: निवडणूक हरल्यावर वाजपेयी काय म्हणाले होते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे कवी मनाचे राजकीय नेते. आपल्या विनोदी स्वभावामुळेही ते लोकप्रिय आहेत. २००४ ची निवडणूक हरल्यानंतर वाजपेयींनी हिमाचल प्रदेशच्या एका शाळेला भेट दिली होती. तिथल्या काही मुलींना त्यांना मामा म्हणून हाक मारली होती. त्यावर वाजपेयी म्हणाले होते की “तुम्ही मला मामा बनवलंत या आनंदात मी एक हजार रुपये या शाळेला देत आहे. तुमची शाळा चालवण्यासाठी खूप पैसे खर्च होत आहेत, एक हजार रुपये ही रक्कम खूप कमी आहे. पण नुकतीच या मामाची नोकरी गेली आहे. पण हरलो म्हणून मी रडत नाही बसलो अरे देवा काय झालं. हरलो तर हरलो. पुढल्या वर्षी बघू.” वाजपेयी किती आशावादी होते हे त्यांच्या या वक्त्यव्यावरून कळून येते.