पैसे न देता कार चोरून नेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

तुझी कार विकत घेतो अशी बतावणी करून एकाने मोहम्मद शफी शेख याचा विश्वास संपादन करून त्याची साडेचार लाखांची कार कागदपत्रांसह चोरून नेल्याची घटना मालवणी येथे घडली. मालवणी येथे राहणार्‍या मोहम्मद शेखकडे मारुती रिट्झ कंपनीची कार होती. ती तो विकणार होता. त्याच्या ओळखीच्या तरुणाने कार विकत घेण्याची तयारी दाखवली. त्यानुसार मोहम्मदने त्याची कार मित्राकडे दिली. 4 लाख 40 हजारांत कारचा सौदा ठरला, पण त्या भामट्याने पैसे न देता कार आणि कारची कागदपत्रे घेऊन पळ काढला. याप्रकरणी मोहम्मद शेखच्या तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाण्यात कारचोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.