अकरावीच्या विशेष फेरीत चांगल्या कॉलेजची लॉटरी, 39 हजार विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अकरावी ऑनलाइनच्या चार गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारी जाहीर झालेल्या विशेष फेरीत चांगल्या कॉलेजची लॉटरी लागली आहे. केसी, मिठीबाई, जयहिंद, एन. एम. यासह पोदार, रुईया, रूपारेल, वझे-केळकर आदी कॉलेजची कटऑफ 81 टक्क्यांपासून 40 टक्क्यांपर्यंत क्लोज झाली आहे. विशेष फेरीत ऑनलाइन अर्ज केलेल्या 47 हजार 576 विद्यार्थ्यांपैकी 38 हजार 567 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी httd://mumbai.11thadmision.net या वेबसाइटवर जाऊन centraliejddw aòocation special round 1 या ऑप्शनला क्लिक करून आपला ऑप्लिकेशन क्रमांक टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या कॉलेजची माहिती मिळेल. जर विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास अशा विद्यार्थ्यांनी 18 ते 21 ऑगस्ट या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 2 ते 10 पसंतीक्रम असलेले ज्युनियर कॉलेज अलॉट झाले असल्यास त्या विद्यार्थ्यास प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनीही या मुदतीत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.  

शाखानिहाय प्रवेश मिळालेले विद्यार्थी

  • आर्टस् 2224
  • कॉमर्स 27,082
  • सायन्स 8734
  • एमसीव्हीसी 527
  • पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेले
  • विद्यार्थी 18, 699
  • दुसर्‍या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी 7,333
  • तिसर्‍या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी 4,210
  • चौथ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी 2,735
  • पाचव्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी 1,984