
सामना ऑनलाईन । मुंबई
शनिवार…दुपारी 1 वाजून 58 मिनिटे… सह्याद्री अतिथीगृहात चार सशस्त्र अतिरेकी घुसले…गेटवरच्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार करीत चारही अतिरेक्यांनी सह्याद्री अतिथीगृहात प्रवेश केला आणि दोघा कर्मचार्यांना ओलीस ठेवले… संध्याकाळी पाचच्या सुमारास फोर्स वनच्या कमांडोंनी अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेऊन आतमध्ये प्रवेश केला…चारही अतिरेक्यांचा खात्मा करून ऑपरेशन यशस्वी झाल्याचा संदेश दिला. अर्थात हे मॉकड्रील होते.
‘वर्षा’वरून फोन
सह्याद्रीला फोर्स वनच्या कमांडोंनी वेढा दिल्याचे पाहून आसपासच्या रहिवाशांना मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याची आठवण आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानापर्यंत या हल्ल्याची बातमी पोहोचताच ‘वर्षा’ बंगल्यावरूनही पोलिसांकडे हल्ल्याबाबत विचारणा झाली, पण हे मॉकड्रील असल्याचे सांगण्यात आले.



























































