
सामना ऑनलाईन । कुलगाम
जम्मू-कश्मीरमधील कुलगामच्या ईदगाह परिसरात ईद-अल-अजहाचा नमाज पढून बाहेर येत असताना पोलिसाची हत्या करण्यात आली आहे. हवालदार फयाज अहमद शहा यांच्या हत्येनंतर परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला असून लष्कराने दशहतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
व्हिडीओ: श्रीनगरमध्ये जवानांवर तुफान दगडफेक, पाकिस्तान आणि इसिसचे झेंडेही फडकवले
#Visuals from Zazripora in Kulgam where terrorists have shot dead a police personnel outside an eidgah. #JammuAndKashmir pic.twitter.com/2H4CIxRrU3
— ANI (@ANI) August 22, 2018
Kulgam: Wreath laying ceremony of Constable Fayaz Ahmed Shah who was shot dead by terrorists outside an eidgah in Zazripora today. Police has registered a case and investigation has started. #JammuAndKashmir pic.twitter.com/o8TYMELNQB
— ANI (@ANI) August 22, 2018
फयाज अहमद शहा हे ईद निमित्त सुट्टी घेऊन आपल्या घरी कुलगाम येथे आले होते. ईदचा नमाज पढण्यासाठी ते ईदगाह परिसरात गेले होते. नमाजावरून परतत असताना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. शहीद फयाज यांच्यावर अंतिमविधी करण्यात आले आहेत.



























































