पंक्चर बघणार्‍या ट्रकमालकाला गाडीची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

ट्रकचा टायर पंक्चर झाला म्हणून ट्रकचालक व मालक तो पंक्चर बघत असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने दोघांनाही धडक दिली. यात चालक जखमी तर मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दहिसर येथे घडली.

दहिसर पूर्वेकडील महालक्ष्मी मंदिराजवळ ट्रकचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालक वाल्मीकी पटवा (26) आणि ट्रकमालक अशोक मिश्रा (60) हे दोघे पंक्चर बघत उभे असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने दोघांना धडक दिली. यात वाल्मीकी हा जखमी झाला तर मिश्रा यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.