तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मिदनापूर

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बैठकीसाठी कार्यालयात आले, तेव्हा हा स्फोट झाला. दरवाजा उघडताच हा स्फोट झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले, तर एक व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडला. मृत कार्यकर्त्याचे नाव सुदीप्त घोष असल्याचे कळाले.

या स्फोटात एकूण पाचजण जखमी झाले असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना मिदनापुर मधील इस्पितळात दाखल करण्यात आले. गंभीररित्या जखमी झालेल्या कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नारायणढ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहे.