
सामना ऑनलाईन । मुंबई
पुणे-इंदूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर स्थानकाजवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या लोकल आणि मेल गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच कर्जत ते अंबरनाथ दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. अंबरनाथ स्थानकावरून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खोपोलीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, या खोळंब्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उद्यान एक्सप्रेस अडकली
दरम्यान, या खोळंब्यामुळे मुंबईकडे येणारी उद्यान एक्सप्रेस वांगणी येथे अडकली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
























































