कश्मीर हॉटेलप्रकरणी मेजर गोगोई दोषी, कारवाईचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

श्रीनगर येथे एका हॉटेलच्या बाहेर एका महिलेसोबत अटक झालेले मेजर लितुल गोगोई यांना श्रीनगर न्यायालयाने झटका दिला आहे. कर्तव्यावर असताना कामाच्या ठिकाणी हजर न राहता श्रीनगर येथील एका स्थानिक महिलेसोबत आढळून आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असलेले मेजर गोगोई हे २३ मे रोजी श्रीनगर येथील ग्रँड ममता या हॉटेलमध्ये बडगाम येथील एका महिलेसोबत आढळून आले होते. आपल्या कर्तव्याच्या वेळात कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष करून ते हॉटेलमध्ये सापडल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली होती. एका ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने मेजर गोगोई यांचा जबाबही नोंदवला होता. चौकशीदरम्यान, संबंधित दस्तऐवजांची तपासणी केल्यानंतर इतर लष्करी अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते.

मेजर गोगोई विरोधातील षडयंत्राचा पर्दाफाश

या चौकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने त्यांना दोषी मानत लष्कराला शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. मेजर गोगोई दोषी ठरल्याने त्यांच्यावर लष्करी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा कोर्ट मार्शल होण्याची शक्यताही आहे. या प्रकरणी २६ मे रोजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी अगर मेजर गोगोई यांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना शिक्षा दिली जाईल, असं म्हटलं होतं.

summary- major gogoi found guilty in hotel case