राजीव गांधी ‘मॉब लिचिंग’चे फादर, भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीमध्ये एका पोस्टरवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी लावलेल्या एका पोस्टरवरून हा सुरू झाला आहे. बग्गा यांनी दिल्लीत भाजप मुख्यालयाबाहेर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ‘फादर ऑफ मॉब लिंचिंग’ म्हणणारे पोस्टर लावले आहे. याला पलटवार म्हणून मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देणारे पोस्टर लावण्यात आले आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे तेंजिदर पाल सिंह बग्गा यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली येथे लावण्यात आलेल्या पोस्टरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टवर हा, राजीव गांधी मॉब लिचिंगचे फादर आहेत, असे लिहिण्यात आले आहे.

बग्गा यांच्यानंतर काँग्रेस प्रवक्ते प्रणव झा यांनी ट्विटर अकाऊंवरून दोन्ही पोस्टरचे फोटो शेअर केले. यावर त्यांनी असे लिहिले की, प्रिय भाजप, पाहा तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये हे अंतर आहे. थोडा वेळ वाट पाहा जनता जनार्दन तुमचा अहंकार आणि द्वेषाचे योग्य उत्तर देईल. हा संस्कारांचा फरक आहे, असे लिहिले आहे.

याआधी मॉब लिचिंगच्या समस्येवर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील मॉब लिचिंगची सर्वात मोठी घटना 1984 ला घडली होती असे म्हटले होते. यानंतर नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 1984 च्या शिखविरोधी दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता असे म्हटले होते.