
सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन
भूक लागल्यावर जर तुमची चिडचिड होत असेल तर याचे कारण तुमच्या आजूबाजूची वातावरण आहे. असं संशोधकांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ केरोलाईनातील संशोधकांनी भूक आणि राग यांच्यातील संबंधांवर संशोधन केले. यासाठी ४०० लोकांची निवड करण्यात आली होती. त्यांचे निरिक्षण करण्यात आले. यावेळी भूक लागल्यावर आपल्या मनातील भावना व आजूबाजूचे वातावरण जर भिन्न असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो. त्यातूनच मग राग येतो. हा राग जाहीर व्यक्त करणे शक्य नसल्यास आपली चिडचिड होते. असे इमोशनल या जर्नलमध्ये संशोधकांनी म्हटले आहे.
आपला हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे उदाहरण दिले आहे. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा तिथे मंद संगीत सुरू असते. जे ऐकून आपले मन हलके होते. काहीवेळासाठी का होईना आपण त्या गाण्याशी संबंधित आठवणींमध्ये रमतो. यामुळे जेवणाची ऑर्डर यायला उशीर झाला तरी आपण वेटरवर खेकसत नाही. पण याउलट जर तुम्ही एखाद्या साध्या हॉटेलमध्ये गेलात जिथे माणसांची खच्चून गर्दी आहे. आजूबाजूला गोंगाट आहे. तर तुमची चिडचिड होते. कारण आजूबाजूचे वातावरण आनंदी नसते.
summary- hunger and anger is connected



























































