
सामना ऑनलाईन। कोलंबो
जगातील टॉपचा योर्करतज्ज्ञ म्हणून ओळखला जाणाऱ्या ३५ वर्षीय लसिथ मलिंगाने सुमारे ११ महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर श्रीलंका क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मलिंगा हिंदुस्थानविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळाला होता. त्यानंतर दुखापतींमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. आता आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी मलिंगाची श्रीलंकन संघात निवड झाली आहे.
अनुभवी मलिंगाच्या समावेशाने श्रीलंकेचा वेगवान मारा अधिक धारदार होणार असल्याची प्रतिक्रिया श्रीलंकन निवड समितीने व्यक्त केली आहे. मलिंगानेही पुनरागमानंतर संघाच्या यशासाठी मी शतप्रतिशत कामगिरी करण्याचा प्रयत्न करिन असे म्हटले आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा श्रीलंका संघ
अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, कुशल मेंडिस, उपल थरंगा, दिनेश चंडिमल, दनुष्का गुणथिलका, थिसारा परेरा, दसून शनाका, धंनजय डिसिल्व्हा, अकीला धनंजय, दिलरुवं परेरा, अनिल अपोन्सो, कासून रजिथा, सुरंगा लकमल, दुशमंथा चमिरा आणि लसिथ मलिंगा.

























































