कुर्ला स्थानकात भिंत कोसळली, चार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकाच्या आवारातील भिंत कोसळून. चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेचा रेल्वे वाहतूकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

कुर्ल्या स्थानकाबाहेरील राममहल हॉटेलजवळील स्थानकाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सिराज (३०), लखन खातल(२९), लक्ष्मण पाटील (४०), अमीर कासीन (५८) हे जखमी झाले. या सर्वांना तत्काळ कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती भाभा रुग्णालयातील डॉक्टर पुनम यांनी दिली.