कश्मीरमध्ये सर्च ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवादी ठार, 12 जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उधमूर

जम्मू कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर आणि फॉरेस्ट गार्डवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर हे दहशतवादी ककरियाला जंगलात फरार झाले होते. सेनेने सर्च ऑपरेशन राबवून त्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या या धुमश्चक्रीत सेनेचे 12 जवान जखमी झाले आहेत.  हे सर्च ऑपरेशन संपल्याची माहिती जम्मू कश्मीरच्या पोलिसांनी दिली आहे.

बुधवारी एका ट्रकमधून अतिरेक्यांनी उधमपूरच्या पोलीस नाक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि एक फॉरेस्ट गार्ड जखमी झाला. हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी ट्रक सोडून जवळच्या जंगलात धूम ठोकली.

तेव्हापासून सैन्याने जंगलात सर्च ऑपरेशन राबवले आणि तीन दशहतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी पाकिस्तानचे असून जैश ए मोहम्मद संघटनेचे असल्याचे कश्मीर पोलिसांनी सांगितले.