
सामना ऑनलाईन। मुझफ्फरपूर
बिहारच्या मुझप्फरपूरमध्ये रविवारी माजी महापौर समीर कुमार आणि त्यांच्या ड्रायव्हरची एके 47 ने गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. माजी महापौर समीर कुमार हे प्रॉपर्टी डीलींग करत होते. या प्रॉपर्टीच्या वादात किंवा राजकारणामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन दुचाकीस्वारांनी ही हत्या केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली.
Muzaffarpur: Samir Kumar, former mayor of the district, along with his driver, shot dead by unidentified assailants near Banaras Bank Chowk. Police say, ‘we’ve recovered 6 cartridges from the spot. It seems that 17-18 rounds were fired. ‘ #Bihar pic.twitter.com/iQ2em6e08I
— ANI (@ANI) September 23, 2018
कुमार यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या गेल्या तर ड्रायव्हर वर 11 गोळ्या झाडल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यानुसार हे काम सुपारी देऊन केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
समीर कुमार हे भाजपचे नेते होते. 2002-07 या काळात त्यांनी महापौर पद भुषवले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही लढवल्या होत्या, पण त्यात त्यांना अपयश आले. गेल्या काही दिवसांत ते पक्षाशी नाराज होते आणि काँग्रेसमध्ये जाण्याचा त्यांचा विचार होता. राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची चांगलीच ओळख होती.
























































