
बाळासाठी ‘ड’ जीवनसत्त्व
- मुलांची त्वचा काळवंडेल या भीतीने आजकालच्या माता त्यांना उन्हात नेत नाहीत. वास्तविक मुलांच्या आरोग्यासाठी ते सगळ्यात मोठे औषध आहे. मुलांसाठी अन्य घटकांबरोबरच ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक आहे आणि ते केवळ सकाळच्या कोवळ्या ऊनातूनच मिळू शकते.
- आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण कमी असल्यास बाळाच्या पायांमध्ये बाक येतो. मुलांच्या हाडांची वाढ आणि विकास होत नाही. त्यांच्या पाठीच्या कण्यावरही त्याचा परिणाम होतो.
- एकोणीस महिन्यांच्या आत बाळाची टाळू भरली नाही तर त्याच्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आहे. त्यामुळे त्यांचे डोके मऊ लागते.
- बऱ्याचदा मुलांना रांगायला, बसायला त्रास होतो. त्यांना तोल सांभाळता येत नाही. कारण त्यांच्या स्थायूंमध्ये वेदना होत असतात. त्यामुळे मुलं चिडचिडी होतात.
- ‘ड’ जीवनसत्त्व नसेल तर बाळाला वारंवार संसर्ग होऊ शकतो. बाळाला सतत सर्दी, खोकला, ताप येत असल्यास त्याच्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- बाळाच्या छातीच्या बरगड्या बाहेर आल्यासारखे वाटत असल्यास त्याच्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आहे असे समजावे.
- हे जीवनसत्त्व नसेल तर बाळाचा विकास मंद असतो. या व्यतिरिक्त जर बाळाला तोल सांभाळता येत नाही किंवा पायावर सूज येत असते.

























































