
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील विविध 26 जिह्यांमधील 930 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान झाले. ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱया व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हे मतदान झाले.
सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान झाले. गडचिरोली जिह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केकळ 3.00 पर्यंतच मतदानाची केळ होती. मतमोजणी उद्या, 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे – 5, रायगड – 96, रत्नागिरी – 15, सिंधुदुर्ग – 3, नाशिक – 20, धुळे – 74, जळगाक – 5, नगर – 66, नंदुरबार – 54, पुणे – 47, सोलापूर – 59, सातारा – 32, सांगली – 1, कोल्हापूर – 15, बीड – 2, नांदेड – 12, धाराशीव – 4, लातूर – 3, अकोला – 3, यकतमाळ – 3, बुलढाणा – 2, नागपूर – 373, कर्धा – 15, चंद्रपूर- 15, भंडारा – 2 आणि गडचिरोली – 4. एकूण – 930.



























































