
सामना प्रतिनिधी । पेण
पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी कासु ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पुन्हा एकदा भगवा फडकवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड व वासुदेव म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद यश मिळविले आहे.
महाडमध्ये 10 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला
या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे आकाशा भगवान नाईक हे निवडून आले आहेत सदस्यपदी मनोज तांडेल, प्रेक्षिता ठाकूर, महानंदा जयराज तांडेल, घनश्याम झावरे, ज्योत्स्ना शिंदे व शिवसेना काँग्रेस युतीच्या सोनाली पाटील, सुरेखा तांडेल हे बहुमतांनी निवडून आले आहे.11 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर 7 सदस्य व सरपंच निवडून आणून शिवसेनेने विरोधात असलेल्या मनसे, भाजप, राष्ट्रवादी, शेकापला चांगलीच चपराक दिली आहे.
कर्जत – भाजपची पाटी कोरी, दोन ठिकाणी शिवसेनेचे सरपंच
शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळेच येथील ग्रामस्थांनी पुन्हा शिवसेनेला निवडून दिले आहे तसेच या पंचक्रोशीचा विकास करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याची ग्वाही नरेश गावंड यांनी दिली.
गडकरींच्या दत्तक गावात भाजपचा दारूण पराभव
पेण तालुक्यात एकूण 9 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होऊ घातल्या होत्या. पैकी कासु ग्रामपंचायतीवर शिवसेना, कुहिरे ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी, गागोदेखुर्द ग्रामपंचायतींवर काँग्रेस, वरेडी ग्रामपंचायतींवर शेकाप, बेनसे ग्रामपंचायतीं वर शेकाप तर जावळी व करंबेळी ग्रामपंचायतींवर शेकापची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच झोतिरपाडा व निधवली येथे आरक्षित उमेदवार नसल्याने सरपंच पदाकरीता अर्ज दाखल न झाल्याने केवळ सदस्यांची निवडणूक पार पडली आहे.




























































