मुंबईच्या समुद्रात लाँच भरकटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उरण

विजांचा कडकडाट, प्रचंड पाऊस त्यातच वादळी वाऱयाचा तडाखा अशा अस्मानी संकटात संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना उरणच्या दिशेने घेऊन जाणारी  फाईज नावाची लाँच अडकली. भेदरलेल्या प्रवाशांनी जिवाच्या आकांताने देवाचा धावाच सुरू केला. अखेर अर्ध्या तासानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ही लाँच भाऊच्या धक्क्यावर नेण्यात आली. वादळात प्रसंगावधान राखून सारंगने लाँच बुचर आयर्लंडजवळ नांगर टाकून असलेल्या एका मालवाहू जहाजाच्या आडोशाला नेली आणि पुन्हा भाऊच्या धक्क्यावर आणली.