
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इटलीचा जगप्रसिद्ध प्लेबॉय मॉरिजियो जफांटी याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी त्याने वय 63 वर्ष होते. 23 वर्षाच्या एका महिलेसोबत सेक्स करताना मॉरिजियोला हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
मंगळवार रात्री मॉरिजियो जफांटी हा एका यूरोपीयन महिलेसोबत होता. या महिलेसोबत सेक्स करत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. महिलेने तात्काळ पारामेडिक्सला फोन करून याची सुचना दिली आणि प्राथमिक उपचार केले. परंतु महत्प्रयासानंतरही त्याचा जीव वाचू शकला नाही. मॉरिजोयी जफांटी याला रोमिओ ऑफ रिमीनी (Romeo of Rimini) या नावानेही ओळखले जात होते. मोरिजोयी याने आपल्या संपूर्ण आयुष्यात 6 हजार महिलांसोबत संबंध ठेवल्याचे बोलले जाते.
कोण आहे मॉरिजोयी?
मॉरिजोयी जफांटी 1970 मध्ये नाईटक्लबमध्ये काम करत होता. वयाच्या 17व्या वर्षी त्याने प्लेबॉय म्हणून पहिल्यांदा काम केले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांशी बोलून त्यांना नाईटक्लबमध्ये आणण्याचे त्याचे काम होते. 1986 मध्ये इटलीतील एका वर्तमानपत्राने मॉरिजोयीचा ‘इटलीतील सर्वात यशस्वी प्रेमवीर’ असा उल्लेख केला होता. 2014मध्ये एका जर्मन वर्तमानपत्राला त्याने शेवटची मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने आता आपण या कामातून मुक्त होणार असल्याचे म्हटले होते.





























































