दोन महिन्यांनी बाहेर काढली आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
28 जुलै दापोलीत आंबनेळी घाटात भीषण अपघात, 33 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । पोलादपूर

पोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस शनिवारी बाहेर काढण्यात आली आहे.जवळपास 410 फूट खोल दरीत कोसळलेली बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता बस बाहेर काढण्याचे सुरू केलेले काम दुपारी 2 वाजता पूर्ण झालं. या कामासाठी ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ची मदत घेण्यात आली. दोन महिन्यांपुर्वी घडलेल्या दुर्घटनेच्या दिवशीही याच ट्रेकर्सची मदत घेण्यात आली होती. ही बस जवळपास 410 फूट खोल दरीत कोसळली होती असं महाबळेश्वर ट्रेकर्सचं म्हणणं आहे.

दोन महिन्यांपुर्वी दापोलिच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. मात्र अपघाताचं नेमक कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही आणि त्यामुळे आता या बसची तपासणी केल्यावर कदाचीत या अपघाताचं तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे.यावेळी पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, तहसीलदार शिवाजी जाधव हे उपस्थीत होते.

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला, ३२ ठार