शाळेत मार मिळाला म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना ऑनलाईन । मुंबई

शाळेत मार मिळाला म्हणून एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. शनिवारी शाळेतून परत आल्यानंतर ही मुलगी उदास होती, असं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही मुलगी शीव येथील के. डी. गायकवाड या सरकारी शाळेत इयत्ता सहावीत शिकत होती. गुरुवारी आणि शुक्रवारी ती शाळेत गेली नव्हती. शनिवारी शाळेत गेल्यानंतर तिच्या गृहपाठ अपूर्ण असल्याने तिला शिक्षकाकडून मार मिळाला. शाळा सुटल्यावर ती घरी गेली. तिला रडत घरी आलेली पाहून तिच्या पालकांनी तिला याचं कारण विचारलं. तेव्हा आपल्याला गृहपाठ पूर्ण न केल्याने शाळेत मार मिळाल्याचं तिने पालकांना सांगितलं. यानंतर काही वेळाने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी ठेवलेली नाही. त्यामुळे शाळेत नक्की काय झालं होतं. याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

summary- girl got slapped from school kills herself