बिल्डरची गुत्तेदारास डांबून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

अर्धवट बांधकाम सोडल्याने बायपास परिसरातील बिल्डरने एका गुत्तेदारास कोंबून मारहाण केल्याची घटना देवळाई परिसरात घडली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किराडपुरा, रहेमानिया कालनीतील जमील खान हुसैन खान हा गुत्तेदार आहे. देवळाइ चौकातील मुजाहेद बिल्डर याने त्यास बायजीपुरा येथील घराचे बांधकाम करण्यास दिले होते. मात्र जमील याने बांधकाम अर्धवट सोडुन दिल्याने बिल्डर मुजाहेद यांनी त्यास राहिलेले ७५ हजारांची रक्कम मागण्यास सुरुवात केली. जमील रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने मुजाहेद यांनी जमील यास मंगळवारी दुपारी कार्यालयात बोलावुन डांबुन ठेवले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.