
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत आझाद मैदानावर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज मोदी आणि भाजप सरकारविरोधात महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते आणि डाव्या संघटना सहभागी झाल्या होत्या. ‘मोदी हटाव, देश बचाव,’ ‘भाजप हटाव, संविधान बचाव’ अशा घोषणांनी आझाद मैदान आणि परिसर दुमदुमून गेला होता. भाकप नेते प्रकाश रेड्डी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
परदेशातील हिंदुस्थानींचा काळा पैसा देशात आणणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, रोजगार निर्मितीसह अनेक आश्वासने मोदी सरकारने लोकांना दिली होती. पण, सत्तेवर आल्यावर त्यातील एकही आश्वासन सरकारने पाळले नाही. खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपविरोधात आपला निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
summary- leftist march against pm modi


























































