कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। निलंगा

मौजे हाडोळी ता.निलंगा येथे कर्जाला कंटाळून एका 62 वर्षीय शेतकऱ्याने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. गोविंद रंगराव माने असे त्याचे नाव आहे.

गोविंद यांची 8 एकर कोरडवाहू शेती होती. पण यावर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने त्यांचे शेतीत फार नुकसान झाले होते. घरखर्चही भागवणे त्यांना मुश्कील झाले होते. यामुळे त्यांना एक एकर शेत विकावे लागले होते. त्यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबरच अन्य एकाकडून कर्ज घेतले होते. पण शेतात नुकसान होत असल्याने कर्जफेड करणे त्यांना शख्य नव्हते. यामुळे ते निराश झाले होते. याला कंटाळूनच मंगळवारी मध्यरात्री गोविंद यांनी किटकनाशक प्राशन केले. कुटुंबियांच्या लक्षात बी बाब आल्यावर त्यांनी तात्काळ गोविंद यांना निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.