
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘मी टू’ मोहिमेत महिलांवर अत्याचार झाल्याची अनेक प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत. घडलेल्या या गोष्टी वाईटच आहेत. अशा आरोपांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईलच. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईलच, असे प्रतिपादन करीत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘मी टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शविला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महिलांकडून होणाऱया आरोपांबद्दल चिंता व्यक्त केली. अशा घटना टाळण्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.
























































