शेअर बाजार 760 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market-fall

सामना प्रतिनिधी, मुंबई

शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून गडगडतोच आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 759.74 अंकांची घसरण होऊन 34,001.15वर बंद झाला. तर शेअर बाजाराचा निफ्टीही 225.45 अंकांनी घसरून 10,234वर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांत चिंतेचे वातावरण आहे.

अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या मोठय़ा पडझडीचा परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर झाला. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांत 4 लाख कोटी बुडाले. गुरुवारी एसबीआय, टाटा स्टील, वेदांता, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसीस, अदानी पोर्ट्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, बजाज फायनान्स सर्व्हिसेस, हिंडाल्को यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसली.

रुपया पावली कम
डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी घसरून 74वर पोहोचला. कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 82 अमेरिकन डॉलवर गेल्याने पैशात घसरण झाली. केल्या काही दिवसांपासून रुपयात सातत्याने घसरण होत असून आयात वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

summary- share market goes down with 760