पाण्याचा ‘ड्रम’लाथाडल्याने रिक्षा चालकाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

भोसरी येथील महात्मा फुलेनगरमध्ये किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकाचा खून झाला आहे. घराच्या बाहेर ठेवलेल्या पाण्याच्या ‘ड्रम’ला लाथ मारल्याच्या रागातून टोळक्याने चाकू हल्ला करून हा खून केला आहे. विलास विनोद गिरी असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तर विलासच्या खुनाप्रकरणी त्याच्या शेजारी राहणाऱ्या यानंद गिरी, बाबू गिरी आणि जय गिरी या तिघांना अटक करण्यात आली आहे.

महात्मा फुलेनगरमध्ये गुरुवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास विलासचा खून झाला. विलास हा रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. विलासच्या हत्येप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.