
सामना ऑनलाईन । सूरत
गुजरातेतील साबरकांठा येथे झालेल्या १४ महिन्यांच्या बाळावरील अत्याचारांचे पडसाद थांबले नाहीत तोच पुन्हा एकदा अशाच घटनेने खळबळ माजली आहे. सूरत येथे साडे तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपीही परप्रांतीय असल्याचं समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता सूरत येथील आपल्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळी तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या अनिल यादव याने तिला पळवलं आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा तिचा मृतदेह जवळच्याच एका घरात सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर अनिल यादव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पुन्हा हिंसाचार उफाळू नये, यासाठी सूरत शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
summary- another rape incident happen in gujarat




























































