
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
सरकारी कर्मचाऱयांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीवर (जीपीएफ) आता 8 टक्के व्याज मिळणार आहे. पुढील तिमाहीसाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाने ‘जीपीएफ’चा व्याजदर 0.4 टक्क्याने वाढवला आहे. नवीन व्याजदर सरकारी कर्मचाऱयांबरोबरच रेल्वे आणि सुरक्षा दलाच्या भविष्यनिर्वाह निधीवरही लागू असणार आहे.


























































