मुहूर्त ठरला… दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Maharashtra chief minister Devendra Fadnavis

सामना ऑनलाईन । सोलापूर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर होणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.

खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणाला संधी मिळणार? मित्रपक्षांना किती मंत्रिपद देणार? भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांना परत संधी मिळणार का?, अशा प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र दसऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित झाल्याने आता विविध नावांची चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.