
विजय जोशी । नांदेड
नांदेड येथील रेल्वे स्थानकावरील टिकीट बुकींग क्लार्कने 80 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्लार्कविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवाशांच्या पैशांचा अपहार केल्याने रेल्वे कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
नांदेड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरील तिकीट बुकींग क्लार्क करुणाकरण व त्याच्या दोन साथीदारांनी मागील 15 दिवसात प्रवाशांकडून आलेल्या तिकीटांची रक्कम बँकेत भरलीच नाही. ही रक्कम जवळपास 80 लाख रुपये असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. ही रक्कम या कर्मचाऱ्यांनी जुगारामध्ये गमावल्याचे ते सांगत आहेत. दीड कोटीचा अपहार उघडकीस आल्याने रेल्वे विभागात खळबळ उडाली असून, दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा व त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी देखील त्याठिकाणी पोहचले आहेत. रेल्वे पोलिसात यासंदर्भात गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरु झाली आहे.






















































